आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह‎:यावलला शाळांमध्ये होळीचा उत्साह‎

यावल‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध शाळांमध्ये‎ होळीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन‎ झाले. विद्यार्थ्यांना होळीचे महत्व‎ तसेच या सणाची माहिती देण्यात‎ आली. रंगांची उधळण करत‎ होलिकोत्सव साजरा करण्यात‎ आला.‎ सरदार वल्लभभाई पटेल‎ स्कूलमध्ये होळीची सजावट‎ करण्यात आली. तिलोत्तमा महाजन‎ यांनी विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व‎ समजावून सांगितले. मुख्याध्यापिका‎ शिला तायडे यांच्यासह विद्यार्थी व‎ शिक्षकांच्या उपस्थितीत पूजन‎ केल्यानंतर होळी पेटवण्यात आली.‎

सर्व विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण‎ केली. संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन‎ यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशांत फेगडे‎ यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी‎ सहकार्य केले.‎ जे.टी.महाजन स्कूल : शाळेत‎ होळी मोठ्या उत्साहात साजरी‎ करण्यात आली. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी प्राचार्या रंजना‎ महाजन होत्या. त्यांच्याहस्ते होळीचे‎ पूजन करण्यात आले. शिक्षिका‎ संध्या पांडव, दिपाली धांडे यांनी‎ विद्यार्थ्यांना होळीची माहिती दिली.‎ शाळेत रंगोत्सव साजरा करण्यात‎ आला. यावेळी शाळेचे शिक्षक व‎ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...