आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक:देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या‎ नोटिशीच्या प्रतींची केली होळी‎; कार्यकर्ते आक्रमक

वरणगाव‎7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ‎देवेंद्र फडणवीस यांना पोलिस ‎प्रशासनाने जी नोटीस दिली आहे‎ त्या नोटिशीचे येथे भाजपतर्फे दहन ‎करण्यातआले.‎ नोटीस देऊन विरोधकांचा‎ आवाज दडपण्याचे काम सुरू‎ असून राज्यात मंत्रीच भ्रष्टाचार‎ करून खंडण्या गोळा करणाऱ्या, ‎दहशतवाद्यांशी संबंध जोपासत‎ असून महा विकास आघाडी‎ सरकारच त्यांचे रक्षण करत आहे,‎ हे दुर्दैव आहे. जर अशा चुकीच्या ‎प्रकाराबाबत आवाज उठवला‎ म्हणून विरोधी पक्ष नेते‎ फडणवीसांना नोटीस बजावणे ही‎ लोकशाहीची हत्याआहे. येथील‎ बस स्टँड चौकात भाजपने त्या‎ नोटिशीचे दहन व महा विकास‎ आघाडी सरकारचा निषेध केला.‎ माजी नगराध्यक्ष सुनील काळे‎ म्हणाले की, आघाडी सरकारने यापुढे भाजप नेत्यांना त्रास देणे बंद‎ करावे.

अन्यथा भाजप कार्यकर्ते‎ राज्य सरकारच्या मंत्र्यांना‎ रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा‎ इशाराही काळेंनी दिला.‎ यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद‎ भैसे, शहराध्यक्ष आकाश निमकर,‎ जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.‎ जंजाळे, शाम धनगर, सुधाकर‎ चौधरी, पप्पू ठाकरे, महिला‎ आघाडीच्या अध्यक्षा मनीषा‎ पाटील, शहराध्यक्ष प्रणिता पाटील,‎ चौधरी, के.के. अंभोरे, गोलू वंजारी,‎ संदीप माळी, डॉ.नाना चांदणे,‎ योगेश माळी, अंकुश साबळे,‎ आकाश महाजन, नरेंद्र बावणे, छोटू‎ सेवातकर, गंभीर माळी, बाळू‎ धनगर, भरत चंदने, रामभाऊ माळी,‎ स्वप्निल पवार, मुस्लिम भाई‎ अन्सारी, डी.के. खाटीक, मयुर‎ गावंडे, नाना चौधरी, राहुल वंजारी,‎ विवेक कुलकर्णी, मयुर वाणी,‎ कस्तुराबाई इंगळे, बंटी सोनार,‎ राहुल जंजाळे यांच्यासह‎ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या.‎

बातम्या आणखी आहेत...