आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी भाषा गौरव दिनानिमित्त फैजपूर येथील प्रसिद्ध लेखक तथा निवृत्त सहाय्यक विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य अनु. जाती, जमाती आयोगाचे सदस्य सचिव किशोर मेढे यांना, दीपक केसरकर आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. २७ रोजी हा कार्यक्रम पार पडला. मेढे यांच्या //"दलित भारत’ या (वैचारिक )ग्रंथास राज्य सरकारच्या साहित्य आणि संस्कृती विभागातर्फे, एक लाख रुपये व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
खान्देशातील आंबेडकरी चळवळीचा वैचारिक वारसा लाभलेल्या कुटूंबातून किशोर मेढे यांनी कार्याला सुरूवात केली होती. सुरुवातीस प्राध्यापक म्हणून धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे १९८६ ते १९९२ पर्यंत ते कार्यरत होते. त्यानंतर १९९२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर अधिकारी वर्ग १ या पदावर त्यांची नियुक्ती झाली. २००१ मध्ये विक्रीकर उपायुक्त पदी पदोन्नती झाल्यानंतर ते सहआयुक्त झाले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगातील सदस्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील विविध कार्यालयांना भेटी देऊन मागासवर्गीयांचे आरक्षण तपासून अनुशेष भरण्यासाठी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.