आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:हुडहुडी पुन्हा परतली, किमान‎ तापमान आले 9.8 अंशांवर‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड‎ वाऱ्यांमुळे तापमानात कमालीची‎ घट हाेत आहे. साेमवारच्या तुलनेत ‎ ‎ मंगळवारी तापमानात घसरण हाेऊन ‎ ‎ ९.८ अंश सेल्सिअस नाेंद झाली.‎ थंडीत वाढ झाल्याने सकाळी‎ फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येवर‎ परिणाम झाला. गेल्या महिन्यात‎ तापमानात हाेणाऱ्या चढ उतारमुळे‎ वातावरणात कमालीचा बदल‎ जाणवत हाेता.

दरम्यान, नवीन‎ वर्षाच्या सुरूवातीलाच थंडीची लाट‎ आली आहे. गेल्या दाेन ते तीन‎ दिवसापासून तापमानात घसरण‎ सुरू आहे. साेमवारी १० अंश‎ तापमानाची नाेंद करण्यात आली.‎ मंगळवारी थंडीत आणखी वाढ‎ झाली. राज्यात जळगावनंतर‎‎ औरंगाबाद व नाशिक येथे १०.६ अंश‎ सेल्सिअस अशी कमी तापमानाची‎ नाेंद करण्यात आली.‎ तीन वर्षांपूर्वी जानेवारीत‎ तापमान ७ अंशांवर:‎ जळगावात जानेवारी महिन्यात‎ यापुर्वी ८ जानेवारी २०१४ राेजी १०.४‎ अंश सेल्सिअस तर १८ जानेवारी‎ २०२० राेजी ७.० अंश सेल्सिअस‎ किमान तापमानाची नाेंद झाली‎ आहे. आगामी काही दिवस थंडीची‎ लाट कायम राहणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...