आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापर्यंत 700 अर्जांची विक्री:रहिवास, उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र देऊन भरता येईल घरकुलांचा अर्ज

भुसावळ4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थींचे अर्ज स्वीकारणे सुरु केले आहे. बुधवारपर्यंत विक्री झालेल्या ७०० पैकी ३० अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले. दरम्यान, उत्पन्न व रहिवास दाखला नसला तरी स्वयं घोषणापत्र देवून हा अर्ज भरता येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी पालिकेने अर्ज मागवले आहे. यासाठी शुक्रवारपर्यंत (दि.२५) अर्ज घेणे व भरण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच पालिकेत गर्दी झाली होती.

पुढील प्रक्रियेत होईल प्रमाणपत्रांची मागणी योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये रहिवास प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्यांकडील वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र या दोन्ही कागदपत्रांऐवजी स्वयं घोषणापत्र देखील घेतले जात आहे. यावर अर्ज भरला जाईल. मात्र, यापुढील प्रक्रियेत ही दोन्ही प्रमाणपत्र मागितले जातील. यामुळे अर्ज भरलेल्यांनी ती काढून घ्यावीत. ती आवश्यक राहतीलच. धीरज बाणईते, समन्वयक, पीएमएवाय योजना

बातम्या आणखी आहेत...