आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:रेल्वेस्थानकावर गांजा आला कसा; फुटेजद्वारे शोध सुरू

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रेल्वे स्थानकातील प्रतीक्षालयात तीन बेवारस बॅगांमध्ये तब्बल ३० किलो गांजा सापडला होता. हा गांजा येथे कोणी ठेवला? याचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी प्रतीक्षालयासह अन्य ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दहा दिवसांचे फुटेज तपासणे सुरू केले आहे.गेल्या मंगळवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील प्रतीक्षालयात श्वान पथकाकडून नियमित तपासणी सुरू होती.

त्यात बेवारस पिशव्यांमध्ये तब्बल ३० किलो गांजा आढळला होता. त्याची किमत ३ लाख रुपयांपर्यंत आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त क्षितिज गुरव, सहाय्यक आयुक्त बी.पी.कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन निरीक्षक आर.के.मीना यांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, स्थानकावर हा गांजा कुणी आणि कसा आणला? एवढी सुरक्षा व्यवस्था असताना अंमली पदार्थ प्रतीक्षालयात आले कसे? याचा तपास करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यादृष्टीने लोहमार्गचे निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा दिवसातील सीटीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...