आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलनी बोगद्याचा पर्याय:हंबर्डीकर चौक-लोखंडी पूल रस्ता 36 दिवस राहणार बंद

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पूल या मार्गावरील हंबर्डीकर चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. या कामाला चार दिवसात सुरूवात करण्याचे नियोजन ठेकेदार चतुर्भुज कंस्ट्रक्शन यांनी केले आहे. हे काम सुरू होताच शहराच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता किमान पुढील ३६ दिवस वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे दोन्ही भागात ये-जा करण्यासाठी नागरिकांना सतारे ब्रीज, आराधना कॉलनी-टिंबर मार्केट बोगद्याचा वापर करावा लागेल.

पालिकेने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत पालिकेचे संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पूल, बाजारपेठ पोलिस ठाणे ते एचडीएफसी नाल्यापर्यंत आरसीसी रोड व गटार बनवणे या कामांना सुरुवात केली आहे. यातील पालिका रुग्णालय ते लोखंडी पुलापर्यंतचा मार्ग रस्ते कामासाठी पूर्णपणे बंद करु नये, अशी व्यापारी व दुकानदारांची मागणी होती. मात्र, ठेकेदाराला दिलेल्या कालमर्यादेत (वेळेत) काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या मार्गाचे टप्प्याटप्प्याने काम होईल. त्यात काँक्रिटीकरण १५ दिवस व यानंतर क्युरिंगसाठी २१ दिवस असे ३६ दिवस हा रस्ता बंद राहणार आहे.त

दुभाजकांच्या कामांना गती... पालिकेन यावल, जळगाव व जामनेर रोडवरील दुभाजकांची कामे सुरु केली आहेत. या कामानंतर दुभाजकांत शेाभिवंत फुलझाडांची लागवड करण्यात येईल. या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

अरुंद मार्गावर गटार नाही
संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पूल या रस्त्यावर रुग्णालय ते हंबर्डीकर चौकापर्यंतचा रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आरसीसी गटारी तयार करणे सुरू आहे. मात्र, हंबर्डीकर चौकापासून पुढे लोखंडी पुलापर्यंतचा रस्ता अरुंद आहे. परिणामी तेथे आरसीसी गटार तयार होणार नाही. नैसर्गिक उताराने पाण्याचा निचरा होईल, असे नियोजन पालिकेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...