आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:हुतात्मा, नागपूर एक्सप्रेस सुरु करा ; डीआरम केडीया यांना रवींद्र पाटलांचे निवेदन

भुसावळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेतील विविध समस्या मांडून रेल्वेच्या महसुलात उत्पन्नवाढ व्हावी, तसेच प्रवाशांना सुविधा मिळावी यासाठी मनमाड एलटीटी एक्सप्रेस धुळेपर्यंत सुरु करावी, भुसावळ-नागपूर व्हाया इटारसी, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस सुरु करावी, झेडटीसी ते फेकरी रस्ता दुरुस्ती आदींसह अन्य मागण्यांबाबत विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रविंद्र पाटील यांनी डीआरएम एस.एस. केडीया यांच्यासोबत चर्चा केली, तसेच निवेदन दिले. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य रविंद्र पाटील यांनी मध्य रेल्वेचे डिआरएम यांची भेट घेतली. यावेळी डीआरएम शंभू शरण केडिया, एडीआरएम रुकमैया मिणा, सिनिअर डीसीएम शिवराज मानसपुरे, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. प्रायोगिक तत्वावर भुसावळ - नागपूर व्हाया ईटारसी हि गाडी पार्सल सर्विस सोबत सुरु करावी जेणेकरून प्रवासी व आपल्या बळीराजाला सुविधा मिळेल यासोबतच भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस सुरु करावी आदी मागणी त्यांनी केली. त्याला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...