आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपजीविका अभियान:फैजपुरात पथविक्रेत्यांना देणार ओळखपत्र‎ ; नगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाली चर्चा‎

फैजपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेचा दीनदयाळ अंत्योदय‎ योजना राष्ट्रीय नागरिक उपजिविका‎ अभियाना अंतर्गत, शहरातील‎ पथविक्रेत्यांना शासनाच्या‎ निर्देशानुसार लाभ दिला जाणार‎ आहे. त्यासाठी शहर पथविक्रेता‎ समितीची सभा आयोजित करण्यात‎ आली होती.‎ राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९‎ नुसार शासनाने विकसित केलेल्या‎ मोबाईल ॲपद्वारे, शहरातील‎ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले‎ आहे. यात ३२१ पथविक्रेत्यांची‎ नोंदणी करण्यात आलेली आहे.‎ योजने अंतर्गत शहरी फेरीवाल्यांचे‎ सर्वेक्षण करणे, सर्वांना‎ ओळखपत्रचे वाटप करणे,‎ फेरीवाल्यांच्या आर्थिक विकास,‎ शहर फेरीवाला आराखडा तयार‎ करणे, फेरीवाल्यांना कौशल्य‎ विकास प्रशिक्षण देणे, फेरीवाला‎ क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत‎ सुविधांचा विकास करणे, अशी‎ कामे होणार आहेत. सर्वेक्षण पूर्ण‎ केलेल्या पथविक्रेत्यांचे यादीत नाव‎ नसल्यास अथवा त्यांच्या काही‎ हरकती/सूचना असल्यास, १२ ‎ऑक्टोबरपर्यंत यांनी लेखी स्वरूपात अर्ज करावेत, असे पालिकेतर्फे ‎कळविण्यात आलेले आहे. ‎ ‎ पथविक्रेत्यांच्या नावाची प्रारूप यादी‎ पूर्ण तपशिलासह पालिकेच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली‎ आहे, त्याचे अवलोकन करावे.‎ पालिका सभागृहात बैठकीला उपस्थित अधिकारी आणि पथविक्रेते.‎

यांची होती उपस्थिती‎ पालिकेत झालेल्या सभेस फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अध्यक्षस्थानी‎ होते. तसेच समितीचे सदस्य फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर‎ आखेगावकर, उपनिरीक्षक मोहन लोखंडे , डॉ.मुद्दसर नजर अब्दुल नबी,‎ संगिता बाक्षे, शेख फारुकी, नगररचना बांधकाम अभियंता उल्हास चुडामन‎ चौधरी, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सुधाकर चौधरी, गणेश चौधरी हजर होते.‎यांची होती उपस्थिती‎ पालिकेत झालेल्या सभेस फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अध्यक्षस्थानी‎ होते. तसेच समितीचे सदस्य फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर‎ आखेगावकर, उपनिरीक्षक मोहन लोखंडे , डॉ.मुद्दसर नजर अब्दुल नबी,‎ संगिता बाक्षे, शेख फारुकी, नगररचना बांधकाम अभियंता उल्हास चुडामन‎ चौधरी, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सुधाकर चौधरी, गणेश चौधरी हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...