आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालघुलेखकांनी सतत अभ्यास करणे, महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम, कायदे वाचणे व अद्ययावत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनात आपली पकड बसेल. स्टेनोग्राफर्सवर कार्यालयाचा दर्जा ठरतो हे लक्षात घ्या असे प्रतिपादन अॅड. दिलीप देशपांडे यांनी केले. स्टेनोग्राफीचे जनक सर आयझॅक पीटमन यांच्या जयंती दिवसानिमित्त महाराष्ट्र स्टेट गर्व्हरमेन्ट मोफुसील स्टेनोग्राफर असोसिएशनतर्फे ऑनलाइन राज्यस्तरीय चर्चासत्र झाले. या वेळी डिजिटल क्रांती, विविध संगणकीय प्रोग्राम्स आदिंच्या प्रवाहात स्टेनोग्राफी कला ही आवश्यक आणि शाश्वत स्वरुपाची आहे व राहील असा आशावाद मार्गदर्शकांनी व्यक्त केला.
चर्चासत्रात उच्च श्रेणी लघुलेखक चारुशीला पाटील, हरीष वरुडकर, डॉ. सोहन चवरे हे प्रमुख मार्गदर्शक होते. नवनवीन शब्दांची निर्मिती स्वत:च करायची. हाताची प्रॅक्टीस निरंतर करा तेव्हा आत्मविश्वासात भर पडेल. तक्रारींचा पाढा न वाचता उपाय शोधा. आकृतीबंध, गटनिहाय अभ्यासाकडे लक्ष ठेवा. काळ बदलला तरी लघुलेखक कला चिरंतन राहील. मूळात जागा जास्त आणि उमेदवार कमी अशी परिस्थिती अगोदर होती; परंतु जागा जरी कमी निघत असल्या तरी इतर संवर्गाच्या दृष्टीने स्टेनोग्राफर्सच्या जागा जास्त आहेत अते ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.