आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महामार्गावर 500 मीटर अंतरावर जलपुनर्भरण केल्यास परिसरातील भूजलपातळी वाढणार ; ‘नही’चे प्रकल्प संचालक काळे यांनी सूचवले पर्याय

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली ते बेडकी पाडा (नवापूर) दरम्यान प्रगतीपथात असलेल्या २९० किमी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या उभारणीनंतर दोन्ही बाजूच्या गावांमध्ये बदल घडतील. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी दाट सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. यासोबतच महामार्गाच्या दोन्ही बाजूने उपलब्ध जागेनुसार ५०० मीटर अंतरावर जलपुनर्भरण करण्याचा उपाय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सुचवले आहेत.

विदर्भातील चिखलीपासून ते खान्देशातील बेडकी पाडा (गुजरात सीमा) पर्यंत २९० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही महिन्यात महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक होईल. सध्या महामार्गावरून दररोज २५ हजार वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीमुळे वायू, ध्वनी प्रदूषणात वाढ होईल. अशा परिस्थितीत गावाच्या बाहेर महामार्गाच्या बाजूने वड, पिंपळ, निंब अशा उंच वृक्षांची लागवड केल्यास प्रदूषण रोखणे शक्य होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...