आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य साधनांची निवड:योग्य साधनांची निवड केल्यास ध्येय प्राप्ती निश्चित : डाॅ.अविनाश सावजी

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच वेळेचे नियोजन करावे. वेळेचे काटेकाेर नियोजन व योग्य साधनांची निवड केल्यास ध्येय प्राप्ती निश्चित होते, असे मत अमरावती येथील प्रयास सेवांकुर संस्थेचे समुपदेशक डॉ.अविनाश सावजी यांनी येथे केले. शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या अहिल्यादेवी कन्या विद्यालयात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे, शिक्षक व पालक आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना समुपदेशक डॉ.सावजी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी योग्य साधनांची निवड केली की ध्येय प्राप्ती ही होतेच. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून परीक्षेत वेगवेगळे टप्पे निश्चित करून पेपर सोडवावेत. मन एकाग्रता तंत्राचा व शरीर शिथिलीकरण तंत्राचा उपयोग करून स्वतःच्या क्षमता वृद्धिंगत कराव्यात, असेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले. यामुळे केवळ परीक्षेतील यशासाेबत तुम्ही पुढील जीवनातही यशस्वी व्हाल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी व्यासपीठावर दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चौधरी, पाहुण्यांचा परिचय आशिष सैतवाल यांनी करून दिला तर आभार महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनी मानले. विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...