आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ विभागातील भादली येथील चौथ्या लाइनच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ७ व ९ नोव्हेंबर असे दोन दिवस ब्लॉक घेतला आहे. यामुळे सोमवारी (दि.७) अप-डाऊन मार्गावरील ७ गाड्या रद्द, तर ९ गाड्यांना विविध स्थानकांवर थांबवण्यात आले. मंगळवारी देखील ११ गाड्या रद्द असतील. तर बुधवारी (दि.९) देखील एक गाडी धावणार नाही.
भुसावळ ते जळगाव दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यात आवश्यक कामासाठी भादली रेल्वे स्थानकावर दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचा विभागातील रेल्वे दळणवळणाला फटका बसला असून एकूण १८ गाड्या रद्द, तर ९ गाड्यांना विभागातील स्थानकांवर सक्तीचा थांबा मिळाला.
त्यात ८ नोव्हेंबर ७ गाड्या रद्द झाल्या. त्यात प्रामुख्याने नाशिक व सूरतकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्यांचा समावेश असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. दिवाळीनंतर परतीच्या प्रवासासाठी केलेल्या नियोजनावर पाणी फिरले. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने रेल्वेने अप-डाऊन करणाऱ्या नोकरदारांची गैरसोय झाली. हीच स्थिती ८ नोव्हेंबरला देखील राहणार आहे. प्रवाशांना बसचा आधार घ्यावा लागेल.
या गाड्या थांबवल्या
सोमवारी अमृतसर-मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस सायंकाळी ४.४५ ते ५.४५ या वेळेत भुसावळ, हटिया-पुणे एक्स्प्रेस सायंकाळी ५ ते ५.५५ भुसावळ, गोरखपुर-एलटीटी सायंकाळी ५ ते ५.५५ पर्यंत भुसावळ, जयनगर-एलटीटी गाडी सायंकाळी ५ ते ५.४० पर्यंत दुसखेडा, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस सायंकाळी ५.१५ ते ५.५५ या वेळेत वरणगाव, बंगळुरू-दिल्ली ही गाडी सायंकाळी ५ ते ५.४० या वेळात जळगाव स्थानकावर थांबवली होती.
मंगळवारी रद्द गाड्या
मंगळवारी (दि.८) रद्द केलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ-इगतपुरी मेमू, इगतपुरी-भुसावळ मेमू, भुसावळ-देवळाली, देवळाली-भुसावळ मेमू, भुसावळ- सुरत पॅसेंजर, नंदुरबार-भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर, भुसावळ-कटनी पॅसेंजर, मुंबई-अमरावती, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस या गाड्या धावणार नाही. यानंतर ९ नोव्हेंबरला पुणे-नागपूर एक्स्प्रेस रद्द केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.