आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभाग:चिखली येथे कपाशीचे अवैध बियाणे पकडले ; कृषी विभाग, पोलिसांची संयुक्त कारवाई

मुक्ताईनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी तालुक्यातील चिखली येथे श्री साईराम अॅग्रो एजन्सीच्या मालकाला कपाशीचे अनधिकृत बियाणे विक्रीप्रकरणी मोहीम अधिकारी तथा कृषी विकास अधिकारी व पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. कृषी विकास अधिकारी विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली येथील कृषी सेवा केंद्र चालकाच्या दुकानाची व घराची झाडाझडती घेतली असता दुकान बंद होते. मात्र, दोन जण ओट्यावर स्वदेशी पाच या संकरित देशी कापूस बियाण्याचे ३० पाकीट टाकून पळून गेले. यानंतर कृषी केंद्राचे मालक प्रदीप शामराव पाटील यांच्या घराची झडती घेतल्यावर रेडी कोर्ट या अनधिकृत एचटीबीटी या वाणाचे ४५० ग्रॅम वजनाची सहा पाकिटे आढळली. मात्र, मालक पसार झाल्याने दुकानात काम करणारे जवरे यांच्याकडून दुकानाची चावी मागितली. नंतर दुकानाची तपासणी केल्यावर एका सीड्स कंपनीचे बनावट बियाणे सापडले. एकूण ५६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच प्रदीप पाटील (रा.चिखली) व गोपाळ वामन जवरे (रा.जवळा बाजार ता.नांदुरा) यांनी विनापरवाना व बनावट बियाणे साठवणूक व विक्री केल्याने दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...