आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरणगाव पोलीस ठाणे हद्दीतील ओझरखेडा गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. देशी व गावठी हातभट्टी दारू, सट्टा व जुगार आदी अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. त्यामुळे महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शुक्रवारी सरपंचांसह ५० पेक्षा जास्त महिलांनी पाेलिस ठाण्यात जावून समस्या व मागण्यांचे निवेदनच दिले.
पुरुष मंडळी देशी व हातभट्टीची दारू सेवन करत असल्याने यापूर्वी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यात या सर्व अवैध धंद्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अवैध दारू विक्री चालकांकडून पोलिस हप्ते घेत असल्याचा आरोपही महिलांनी यावेळी केला. वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ खेडे येतात. तेथे वॉश आऊट मोहीम राबवा, अशी मागणी त्यांनी केली. अवैध धंदे चालकांना पोलिस विभागातील कर्मचारी व राजकीय पदाधिकाऱ्यांचे सहकार्य असल्याने कारवाई हाेत नसल्याची परिसरात चर्चा आहे.
आेझरखेडा येथील मुख्य बसस्थानक चौक, तळवेल-ओझरखेडा रोड, आराेग्य उपकेंद्र, ग्रा.पं. कार्यालयासमोर व जि.प. शाळेजवळ दारू विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच संगीता पाटील, रेखा इंगळे, नितीशा निळे, कविता कोळी, सोनाली पाटील, शांताबाई निळे, सुनीता कोळी, सोनाली पाटील, हेमलता कोळी, दीपाली निळे, बबली इंगळे, सरला उन्हाळे, वर्षा नेमाडे, दीपाली पाटील, अर्चना पाटील, भाग्यलता झांबरे, कोमल भंगाळे, विद्या सपकाळे, नादराबाई सुरवाडे, गुंफाबाई सुरवाडे, सुनीता बोदडे, लीलाबाई सुरवाडे, शोभाबाई साबळे, वच्छलाबाई निकाळजे, रेखा बिऱ्हाडे, बेबाबाई बहारे, मायाबाई सुरवाडे, मीराबाई पाटील, रेखा पाटील, कोमल भंगाळे, चंद्रभागा निळे आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ठराविक स्थळी कारवाई
पाेलिसांकडून कारवाई करताना काही ठराविक ठिकाणीच कारवाई केली जाते. मात्र इतर ठिकाणी अवैध धंदे बिनबोभाट सुरू असतात. त्यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न महिलांकडून यावेळी अधिकाऱ्यांकडे उपस्थित करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.