आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ शहर पोलिस ठाण्यात शनिवारी आयोजित तक्रार निवारण दिनात अवैध सावकारीच्या तक्रारींसाठी आवाहन केले होते. मात्र, याबाबतची एकही तक्रार प्राप्त झाली नाही. कौटुंबिक वाद, फसवणूक, ठेवीदार, शाळेतून पगार मिळत नाही, प्लॉट खरेदी-विक्रीत झालेली फसवणूक अशा १९ तक्रारी आल्या हाेत्या. त्यात दोन प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. १२ प्रकरणात समझोता झाला.
भुसावळ शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्याच्या नाटयक्षेत्रासाठी ६ ऑगस्टला शहर पोलिस तक्रार निवारण दिन आयोजित केला होता. डीवायएसपी सोमनाथ वाघचाैरे, निरीक्षक गजानन पडघन उपस्थित हाेते. यावेळी ज्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात बहिणींना बेदखल करून मुलाने वडिलांची मालमत्ता परस्पर नावावर केल्याची तक्रार मेव्हण्याने शालकाविरुद्ध केली. त्यात आपसात समजाेता करण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात जुने सतारे भागात दाेन गटातील तरुण तेथे बसतात. एकमेकांना खुन्नस देणे, लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकणे, जातीवाचक शिवीगाळ करतात अशा तक्रारी घेऊन दाेन पुढारी आले हाेते.
याप्रकरणी कारवाई करणे, पालिकेला तेथील अतिक्रमणातील दुकाने, टपऱ्या काढण्याची सूचना दिली. काेणी हा प्रतिष्ठेचा मुद्दा करून कायदा हातात घेतला तर त्यांना हिसका दाखवण्याचा इशारा डीवायएसपींनी दिला.
चाैकशी आदेशांचा उपयाेग नाही; ठेवीदारांची खंत
तक्रार निवारण दिनी महिला पुरुष ठेवीदारांनी पतसंस्था चालक ठेवी देत नसल्याची कैफियत मांडली. आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चाैकशीचे आदेश असूनही उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त केली. एका परिवाराने प्लॉट विक्रीचा व्यवहार केला. त्यापाेटी २ लाख ११ हजार रूपये घेतले. मात्र, ऐनवेळी खरेदीस व पैसे परत देण्यास नकार दिल्याची तक्रार आली. २ दिवसांत पैसे न मिळाल्यास गुन्हा दाखल करण्याची सूचना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.