आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्करी:महिलांच्या पथकाने पकडले अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर

यावल3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील किनगाव-डोणगाव रस्त्यावर महसूलच्या पथकाने एक ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई महिलांच्या पथकाने केली.

यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी गस्ती पथक नेमले आहे. यात बामणोदच्या मंडलाधिकारी बबिता चौधरी यांच्या नेतृत्वात कोसगाव तलाठी सुचिता देशभ्रदार, शिरसाड तलाठी कीर्ती कदम या महिलांच्या गस्ती पथकाला किनगाव - डोणगाव रस्त्यावर एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक होताना दिसली. पथकाने ट्रॅक्टरला थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र, परवाना नसल्याने पथकाने ट्रॅक्टर यावल पोलिस ठाण्यात जमा केले.

बातम्या आणखी आहेत...