आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोड:बोदवड शहरात अवैध लाकूडसाठा पकडला

बोदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वृक्षतोड करुन वाहतूक करणारे ट्रॅक्टर बोदवड शहरातील राज हाॅटेलच्या मागे लाकडाचे ओंडके फेकून पसार झाले. ही माहिती मिळताच वनपाल उमाकांत कोळी यांनी तक्रारदार छावा संघटनेचे विधानसभा संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे यांचेसमोर रात्री पाहणी केली. यानंतर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता वनपाल कोळी, वनरक्षक दीपाली शिर्के यांनी पंचनामा करून लाकडाचे ४१ ओले ओंडके ताब्यात घेतले.

वृक्षतोडीनंतर लाकडांची वाहतूक करून काही सॉमील परिसरात अवैध साठा केला जातो, अशी तक्रार छावा संघटनेचे संपर्कप्रमुख अमोल व्यवहारे यांनी वन विभागाकडे केली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांनी चौकशी केली. दरम्यान, गुरुवारी रात्री एका हॉटेलमागे लाकडाचे ओंडके फेकून दिले होते. हा साठा जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...