आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:गुरांची अवैध वाहतूक, ट्रक पकडला

सावदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर २९ गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास येथील भारतेश्वर मंदिराजवळच पकडण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सावदा-रावेर मार्गावर भारतेश्वर मंदिराजवळ रावेरकडून येणाऱ्या ट्रकमध्ये (क्रमांक डीडी.०१-जी.९३५०) दोन कप्पे करून २९ गुरे कोंबली होती. त्यांची अवैध मार्गाने वाहतूक सुरू असल्याची माहिती रावेर, निंभोरा, मोठे वाघोदा येथील गोरक्षकांना मिळाली. त्यांनी सिनेस्टाइल पाठलाग करून हा ट्रक थांबवला. त्यातून गुरांची वाहतूक उघड झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांना ट्रकमध्ये २९ गुरांना कोंबल्याचे दिसले. यातील तीन मृतावस्थेत होते. जीवंत गुरांना पोलिस बंदोबस्तात जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले. घटनास्थळी सावदा पोलिस ठाण्याचे एपीआय देविदास इंगोले, फैजपूरचे सिद्धेश्वर आखेगावकर, उमेश पाटील, रुस्तम तडवी, देवेंद्र पाटील यांनी बंदोसब्त ठेवला.

बातम्या आणखी आहेत...