आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन निर्विघ्न:राहुलनगर घाटावर विसर्जन; तापीवर 80 जीवनरक्षक, सीसीटीव्ही बसवणार

भुसावळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत चतुर्दशीला होणारे श्रीगणेशाचे विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाने तयारी चालवली आहे. त्यात मिरवणुकीला अडथळ नको म्हणून यंदा शहरातील बसस्थानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाऐवजी वरणगाव रोडवरील एसटी डेपोत स्थलांतरीत करण्यात येईल. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र जनरेटर, तापी नदीत आपत्ती व्यवस्थापनासाठी बोट व ५० जीवनरक्षक तैनात केले जातील. दरम्यान, यंदा केवळ तापी नदीतील राहूल नगर घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे.

पालिकेने श्रींच्या विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. त्यात रात्री उशिरापर्यंत विसर्जन होत असल्याने अंधारामुळे गैरसोय नको म्हणून तापी नदीच्या राहुल नगर घाटावर एका जनरेटरची व्यवस्था असेल. यावल हद्दीमधील तापी नदीच्या उत्तरेकडील काठावर देखील प्रखर उजेडाचे दिवे बसवले जातील. विसर्जना दरम्यान दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून ८० पट्टीचे पोहणारे, एक बोट उपलब्ध असेल. जीवनरक्षकांना ओळखीसाठी टी-शर्ट देण्यात येतील. मिरवणुकीचा स्टेशन रोड, जामनेर रोडवरील वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून दरवर्षी रेल्वे स्थानकाजवळील बसस्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तात्पुरते स्थलांतर केले जाते. यंदा मैदानाची नासधूस होऊ नये म्हणून बसस्थानक वरणगाव रोडवरील एसटी डेपोमध्ये हलवण्यात येईल. वरणगाव रोड व महामार्गावरून वाहतूक होईल.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर : विसर्जन मिरवणुकीवर यंदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील. मिरवणूक मार्गावर ८ ठिकाणी तसेच तापी नदी पात्रात काही ठिकाणी हे कॅमेरे बसवले जातील. डीवायएसपी, शहर, बाजारपेठ पोलिस निरीक्षकांसोबत फिरते कॅमेरे असतील. यामुळे मिरवणूक, शहरातील प्रत्येक हालचाल टिपली जाईल. गृहरक्षक दल, राज्य राखीव दलाची तुकडी व अतिरिक्त पोलिस कुमक राहील.

निर्माल्य संकलन सुविधा : तापी पात्रातील प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून घरगुती श्रींच्या विसर्जनासाठी येणारे भाविक, सार्वजनिक मंडळांकडून निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे. यासाठी यावल रोडवरील वन विभागाचा नाका, नदीकाठावर दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्माल्य संकलन केंद्र उभारले जाईल. भाविकांनी तेथे निर्माल्य दान द्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

बॅरिकेटिंगने मुख्य मार्गाला जोडणारे उपरस्ते होणार बंद
नृसिंह मंदिर, डिस्को चौक, अप्सरा चौक, मरिमाता मंदिर, जामा मशीद परिसर, सराफ बाजार, गांधी चौक या प्रमुख मार्गांना जोडणारे सर्व लहान मोठ्या रस्त्यांवर बॅरिकेटिंग करून ते वाहतुकीसाठी बंद केले जातील. यामुळे भुसावळकरांना जामनेर रोड, स्टेशन रोड या मार्गाचा वापर केला जाईल.

यंदा मिरवणूक मार्गावर सुरळीत वीज
मिरवणूक मार्गावर वीज वाहिनी प्रश्न बिकट असतो. यामुळे मिरवणुकीदरम्यान दरवर्षी वीजपुरवठा खंडित करावा लागतो. यंदा मात्र ब्राह्मण संघ ते गणेश मॉलपर्यंत भूमिगत वीजवाहिनी टाकली गेली आहे. तसेच मशीद व सराफ बाजारातील चार ठिकाणी एरियल बंच केबल टाकली आहे. आमदार संजय सावकारे यांनी याबाबत आढावा घेतला. त्यामुळे यंदा वीजपुरवठा खंडित होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...