आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ:चोरटे शिरजोर; अयान कॉलनीतील बंद घर फोडून २० तोळे सोने, ५० तोळे चांदी लांबवली

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अयान कॉलनीतील चोरीचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली. त्यातून ठोस असे धागेदोरे हाती आले नाही.

शहरातील अयान कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त लोको पायलट कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सुमारे २० तोळे सोने, ५० तोळे चांदी आणि रोख ३० हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सेवानिवृत्त लोको पायलट असदअली खान हे १६ मार्चला कुटुबांसह उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे गेले होते. यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

यानंतर कपाटातील ३० हजारांची रोकड, २० तोळे सोने आणि ५० तोळे चांदी लांबवली. १६ ते १९ मार्च दरम्यान झालेली ही चोरी शनिवारी सकाळी उघडकीस आली. असदअली खान यांनी मोबाइलवरून ही माहिती कळवताच सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, मंगेश गोंटला, योगेश महाजन, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. जळगाव येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले. श्वानाने घरापासून काही अंतरापर्यंत माग दाखला.

बातम्या आणखी आहेत...