आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:भुसावळ शहरात प्रभाग एक, दोनमध्ये गटारी भरल्या तुडुंब ; खड्डेमय रस्ते व पथदिवे बंद असल्याने त्रास

भुसावळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक एक व दोनमधील बहुतांश भागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांकडून गटारींची स्वच्छता केली जात नाही. यामुळे आता पावसाळ्याच्या तोंडावर गटारी तुडूंब भरल्या आहेत. दैनंदिन कचरा संकलन होत नसल्याने या भागात कचऱ्याचे ढिग कायम आहेत.

शहरातील प्रभाग एक मध्ये येणाऱ्या श्री गजानन महाराजनगर, सोपान कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, महिला महाविद्यालय परिसर, राहुलनगर भाग, केंद्रीय विद्यालय परिसर, चिंतामणी विहार, प्रभात कॉलनी, मैनाबाईनगर, प्रभाग दोनमधील तापीनगर, एन.के.नारखेडे परिसर, सप्तश्रृंगी मंदिराचा भाग, समतानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या आहेत. यामुळे अस्वच्छता वाढली आहे. पालिका प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून या भागात धुरळणी व फवारणी झाली नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये आधीच तुंबलेल्या गटारींमधून पाण्याचा निचरा होणार नसल्याने रस्त्यांवर तळे साचेल. शहरात घर ते घर कचरा संकलन केले जाते, मात्र या भागातील रस्त्यांवरील कचरा उचलला जात नाही. यामुळे या दोन्ही प्रभागांमध्ये सध्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न उभा राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...