आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त १६७५ जणांनी घेतला बूस्टर डोस:भुसावळात ८ महिन्यांत केवळ १६ टक्के नागरिकांना बूस्टरची मात्रा

भुसावळ4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनावर नियंत्रणासाठी शासनाने १५ जुलैपासून बूस्टर डोस मोफत केला. मात्र, यानंतर भुसावळात प्रतिसाद नाही. गेल्या सात दिवसांत भुसावळ शहरातील पाच व तालुक्यातील एकूण २३ लसीकरण केंद्रांवर केवळ १६७५ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. तर डिसेंबर २०२१ पासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली, यानंतरच्या आठ महिन्यांत एकूण उद्दिष्टाच्या केवळ १६ टक्के लसीकरण झाले.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत भुसावळात तब्बल १४ हजार ९०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले. ३४० रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाची लस उपलब्ध होताच शहरातील लसीकरण केंद्रांबाहेर रांगा लागल्या हाेत्या.

डॉ.कीर्ती फलटणकर यांना थेट प्रश्न
Q : बूस्टर घेतला नाही तर नागरिकांना काय धोके आहेत?
A : नवीन म्युटेशन होऊन नवीन प्रकार आला तर धोका आहे. इम्युनिटी पॉवर वाढणार नाही. कोमॉर्बिड रुग्णांना धोका होऊ शकतो.
Q : बुस्टर डोसचे प्रमाण अल्प असल्याची कारणे काय?
A : कोविड घरीच औषधोपचारामुळे बरा होतो. जे रुग्ण आहेत, त्यांना सौम्य लक्षणे असल्याच्या स्थितीतून बूस्टरची गरज वाटत नसावी.
Q : लसीकरण वाढावे यासाठी काय उपाययोजना आहेत?
A : कर्मचारी घरोघरी ज्येष्ठांना, शाळेत विद्यार्थ्यांचे लसीकरण करतो. याशिवाय नियमित केंद्रात डोस उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...