आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जाणकारांनी काढली दोघांची समजूत‎‎:बोदवड पालिकेत 2 नगरसेवकांत‎ धक्काबुक्की, वाद आपसात मिटले‎

बोदवड‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर पंचायतीत दाेन‎ नगरसेवकांमध्ये चांगलीच‎ खडाजंगी झाल्याचे पहावयास‎ मिळाले. प्रकरण पाेलिस ठाण्यापर्यंत‎ गेले. मात्र तेथे दाेन-अडीच तास‎ समजुतीनंतर दाेघांमध्ये समेट घडून‎ अाला.‎ शहर नगरपंचायतीच्या‎ सभागृहामध्ये नगरसेवक हाजी सईद‎ बागवान व स्वीकृत नगरसेवक‎ दीपक झांबड यांच्यामध्ये काही तरी‎ कारणावरून खडाजंगी उडाली.‎ ‎प्रकरण धक्काबुक्की पर्यंत गेले.‎ मात्र त्यानंतर तेथे उपस्थित इतर‎ नगरसेवकांनी त्यांची समजूत‎ घातली. यावेळी पोलिसांना पाचारण‎ करण्यात आले. यानंतर नगरसेवक‎ झांबड यांना पोलिसांनी गाडीत‎ बसण्याची विनंती केली.

मात्र ते‎ गाडीत न बसता मोटारसायकलने‎ घराकडे जात हाेते.‎ त्यावेळी घराजवळच कोणीतरी‎ त्यांना वीट मारून फेकली. अाणि‎ त्याचवेळी तेथे आलेले बागवान‎ यांच्या कुटुंबातील सदस्य व झांबड‎ यांच्यात वादवादी झाली. हे सर्व‎ घडल्यानंतर काही नागरिकांनी त्यांचे‎ भांडण सोडवले. त्यानंतर‎ दोन्हीकडील मंडळी पोलिस‎ ठाण्यापर्यंत गेले.‎ तेथे शहरातील काही राजकीय व‎ सामाजिक क्षेत्रातील लोकांनी दोन्ही‎ बाजूंची दोन-अडीच तास समजूत‎ घालून वाद मिटवला. याप्रकरणी‎ रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा‎ दाखल झालेला नव्हता. दोन्ही‎ नगरसेवकांमध्ये समेट झाल्यानंतर ते‎ एकमेकासाेबत बाहेर निघाले.‎ त्यामुळे अनेकांनी सखेद आश्चर्य‎ व्यक्त झाले.‎

बातम्या आणखी आहेत...