आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळासिद्धी उपक्रमा अंतर्गत बाह्यमुल्यमापनाची प्रक्रिया सुरू आहे. स्वयंमूल्यमापनात मांडलेल्या बाबी सिद्ध करून दाखवण्यासाठी, पुरावे म्हणून बाह्यमुल्यमापनात संकलन, वर्गीकरण, मांडणी व सादरीकरणाला विशेष महत्व असते, असे प्रतिपादन शाळासिद्धीचे राज्य निर्धारक प्रमोद आठवले यांनी केले. कंडारी येथील प्रतिभा पाटील प्राथमिक विद्या मंदिरात पार पडलेल्या शाळासिद्धी बाह्यमुल्यमापन प्रक्रियेप्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी, महादेव सरकटे, सोनवणे उपस्थित होते.
प्रारंभी शाळासिद्धीचे जळगाव जिल्हा समन्वयक तथा राज्य निर्धारक डॉ. जगदीश पाटील व राज्य निर्धारक प्रमोद आठवले यांनी वर्गभेट करून विद्यार्थी संपादणूक जाणून घेतली. तसेच शाळेचा भौतिक परिसर व शाळासिद्धीच्या अनुषंगाने इतर बाबींची पडताळणी केली. शाळासिद्धी अंतर्गत बाह्यमुल्यमापनासाठी करायची तयारी या विषयावर प्रमोद आठवले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. जगदीश पाटील यांनी शाळासिद्धी कार्यक्रमाची संकल्पना, स्वयंमूल्यमापन, बाह्यमूल्यमापन, पुराव्यांची तयारी यासह विविध बाबींवर प्रकाशझोत टाकला.
शाळेची गुणवत्ता वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांची आहे. आधुनिक जगात स्पर्धेला महत्व असल्याने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाळासिद्धी महत्त्वाचे माध्यम आहे. या उपक्रमांतर्गत बाह्यमूल्यमापनाची तयारी म्हणून सात क्षेत्रनिहाय व ४६ गाभा मानकानिहाय पुराव्यांचे संकलन, वर्गीकरण, मांडणी, सादरीकरण व जतन कसे करायचे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, असेही मत व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.