आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:अर्धा तासात बंद घरातून 3 लाखांचा ऐवज लांबवला

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नाहाटा कॉलेज जवळील चंद्रमा प्लाझा अपार्टमेंटच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चौघांनी सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल लांबवला. शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास ही चोरी झाली.चंद्रमा प्लाझा अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर रेल्वेतील निवृत्त कर्मचारी केशव नेमाडे हे राहतात. ते शनिवारी सायंकाळी त्यांच्या नातीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. यामुळे घराचा दरवाजा बंद होता.

चार चोरट्यांनी ही संधी साधून दरवाजाचे कुलूप कापून घरात प्रवेश केला. बेडरूमध्ये कपाटातील तिजोरीचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले ७० हजार रूपये राेख, सुमारे ५ ताेळ्याचे साेन्याचे दागिने असा ऐवज घेऊन पसार झाले. अर्ध्या तासांत नेमाडे घरी येत असताना त्यांच्या अपार्टमेंटजवळून चोरटे चारचाकीतून पसार झाले. चोरट्यांनी घरातील मद्याचा आस्वाद घेतला.

साबणांचे पाकिट व निरमा पावडर घेऊन पसार झाले. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पाेलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय सुदर्शन वाघमारे, तुषार पाटील व कर्मचाऱ्यांनी पाहाणी केली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. फुटेज मिळते का? हा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...