आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी राखीव:मुक्ताईनगर तालुक्यात   ४ गण महिलांसाठी राखीव

मुक्ताईनगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी तहसील कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या आठ गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात रुईखेडा- अनुसूचित जाती महिला, उचंदे- अनुसूचित जमाती महिला, हरताळा- अनुसूचित जमाती, अंतुर्ली- सर्वसाधारण महिला, निमखेडी बुद्रूक- नामाप्र सर्वसाधारण, कर्की- सर्वसाधारण महिला, कुऱ्हा- सर्वसाधारण , वढोदा- सर्वसाधारण असे आरक्षण निघाले.

रुईखेडा गणामध्ये एससीचे आरक्षण मिळाले नसल्याने सरळ अनुसूचित जाती महिलांमधून या गणाला आरक्षण देण्यात आले. उचंदा व हरताळा गणांत एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले नसल्याने साेडतीद्वारे उचंदा गणातून एसटी महिला आरक्षण काढण्यात आले. निमखेडी बुद्रुक व वडोदा गणांना ओबीसीचे आरक्षण मिळाले नसल्याने या दोन्ही गणांमधून चिठ्ठी काढून निमखेडी बुद्रुक येथे ओबीसी सर्वसाधारण आरक्षणाची सोडत काढण्यात आली. तसेच सर्वसाधारण चार जागांपैकी राहिलेल्या दोन महिलांसाठी अंतुर्ली, कर्की व कुऱ्हा या तीन गणांतून महिला आरक्षणासाठी दोन चिठ्ठ्या काढून अंतुर्ली व कर्कीला सर्व साधारण महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. आठ गणांमधून ५० टक्के म्हणजे चार जागांसाठी महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.

पंचायत समितीच्या आठ गणांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अंतुर्ली व कर्की या गणांमध्ये महिला आरक्षण असल्याने इच्छुक पुरुष उमेदवारांचे धाबे दणाणले. तसेच हरताळा, रुईखेडा व उचंदा या गणातून एससी व एसटीचे आरक्षण निघाल्याने इच्छुक मातब्बरांचा हिरमाेड झाला आहे. आरक्षणानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पं.स. निवडणुकीसाठी कंबर कसून रणनीती ठरवावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...