आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या प्रगती पॅनलने, विरोधी गटाच्या इनकलाबी पॅनलचा धुव्वा उडवला. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी विजय मिळवत सर्व १४ जागा जिंकल्या. निवडणुकीचा निकाल गुरुवारी रात्री उशिरा लागला. निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाने जल्लोष केला. नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी मतदान झाले होते. संस्थेच्या १४ जागांसाठी २९१पैकी २७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकुण ९३.८१ टक्के मतदान झाले होते. मतदानानंतर सात वाजेपासून मतमोजणीला सुरू झाली. सत्ताधारी गटाच्या मोहंमद ताहेर शेख चाँद यांच्या नेतृत्वात प्रगती पॅनलने, अब्दुल करीम कच्छी यांच्या इनकलाबी पॅनलचा पराभव करत, सर्व १४ जागांवर विजय मिळवला. निवडणुक निर्णय अधिकारी शेख सलीम शेख अब्दुल नबी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शेख रफीयोद्यीन अब्दुल नबी, शेख हारून शेख अमीर, मजीद खा हमीद खा, इफ्तेखार अहेमद शेख अखलाख, अय्युब खान फजलूल रहेमान, नासिर खान रहेमान खान, फारूकी जव्वाद अहेमद यांनी काम पाहिले. निवडणुकीत सत्ताधारी गट एकतर्फी विजयी झाला.
विजयी उमेदवार अन् मते
मोहंमद ताहेर शेख चाँद १८५, हाजी शब्बीर खान १८०, इकबाल खान नसिर खान १७८, अजीज खान हमीद खान १७२, मो. याकूब शेख यासीन १७१, अय्युब खान हमीद खान १७०, गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर १६९, मुस्तुफा खान सुभान खान १६९, शेख इब्राहिम शेख चाँद १६९, युसूफ खान ताहेर खान १६४, अताउल्ला खान सैफउल्ला खान १५९, जफरउल्ला खान अमानउल्ला खान १५८, हुसेन खान भिकारी खान १५८, जहिर बेग नुर बेग मिर्झा १४७.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.