आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराख्रिसमसनिमित्त शहरातील चर्चमध्ये विविध कार्यक्रम होतात. सोमवारपासून कॅरल सिंगिंग होणार आहे. शहरात नाताळाचा उत्साह पाहता बाजारातील उलाढाल देखील वाढणार आहे. दरम्यान, नाताळासाठी विविध चर्च व परिसरात रंगरंगोटी, साफसफाईची कामे सुरू झाली आहेत.
अलायन्स मराठी चर्चमध्ये सुद्धा सफाई अभियान राबवण्यात येत आहे. पास्टर स्वप्निल नाशिककर यांच्या मार्गदर्शनाखाली रंगरंगोटी व सजावटीची कामे सुरू आहेत. ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त या चर्चमध्ये १९ ते २३ डिसेंबरदरम्यान दररोज विविध भागांमध्ये कॅरल सिंगिंग होईल. २५ डिसेंबरला ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त विशेष उपासना होईल. पास्टर स्वप्नील नाशिककर हे संदेश देतील. २६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता चर्च परिसरात विविध स्पर्धा होतील. २७ला सायंकाळी ६ वाजता संडे स्कूल, २८ला सकाळी ११ वाजता पिकनिक कार्यक्रम, २९ला सकाळी ९ ते ११ चित्रकला, निबंध स्पर्धा, ३०ला प्रितीभोज, ३१ डिसेंबरला रात्री ९ वाजता भजने, चहापान असे कार्यक्रम होतील. १ जानेवारीला सकाळी ९ वाजता नववर्ष उपासना होईल. पास्टर स्वप्नील नाशिककर, अध्यक्ष प्रवीण ओहोळ, सचिव फिलिफ फ्रान्सिस, प्रेमचंद जाधव, जया फ्रान्सिस मनी यांच्या मार्गदर्शन आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.