आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्याचे नुकसान:सावखेडा शिवारात केळीचे खोड, घड ‎ कापून फेकले; हजारोंचे नुकसान

सावखेडा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनावल, कुंभारखेडा येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या‎ नुकसानीचे सत्र सुरू असतानाच‎ पुन्हा सावखेडा शिवारात एका‎ अज्ञात इसमाने शेतकऱ्याच्या‎ केळीचे खोड व घड कापून फेकत नुकसान केल्याची घटना घडली.‎ सावखेडा बुद्रुक येथील शेतकरी संजय मधुकर महाजन यांच्या‎ शेतातील ३५-४० केळीचे खोड,‎ घड अज्ञातांनी कापून फेकल्याचे मंगळवारी उघडकीस आले. दुसऱ्या ‎एका घटनेत सावखेडा शिवारातच‎ १४ रोजी मनोहर घनश्याम चौधरी‎ (गट नंबर ४२८) यांचे शेत हेमंत ‎काशिनाथ महाजन हे करत असून ‎त्यांच्या शेतातील अंदाजे हरभरा ‎ ‎ पिकामध्ये बकऱ्या चारून नुकसान ‎केल्याची घटना घडली. त्या संबंधितावर सावदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून‎ तपास पोलिस करत आहेत.‎ दरम्यान या सतत होणाऱ्या शेतमाल‎ नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस‎ आला आहे. परिसरातील‎ शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण‎ पसरले आहे. सावदा पोलिस‎ ठाण्यात संजय महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ पोलिस गस्त पथक या घटनांचा‎ सातत्याने तपास करत आहे.‎

सावखेडा शिवारात अज्ञातांनी संजय मधुकर महाजन यांच्या शेतातील‎ केळीचे खोड व घड कापून केलेले नुकसान.‎ सावदा पोलिस ठाण्यास १० कर्मचारी जास्तीचे नियुक्त‎ पोलिसांनी या भुरट्या चोऱ्या तसेच नुकसान करणाऱ्या चोरांना शोधून कठोर‎ कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दुसरीकडे पोलिस अधिकारीही‎ या चोरांना पकडण्यासाठी जिवाचे रान करत असून शेत शिवारांमध्ये गस्त‎ घालत आहेत. जिल्हा पोलिस यंत्रणेकडून सावदा पोलिस ठाण्याला १०‎ पोलिस कर्मचाऱ्यांची जास्तीची कुमक देण्यात आली आहे. आता पोलिस‎ यंत्रणा चिनावल, कुंभारखेडा, सावखेडा परिसरातील चोरट्यांना पकडून‎ कडक कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे.‎ सावदा पोलिस ठाण्यास १० कर्मचारी जास्तीचे नियुक्त‎ पोलिसांनी या भुरट्या चोऱ्या तसेच नुकसान करणाऱ्या चोरांना शोधून कठोर‎ कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दुसरीकडे पोलिस अधिकारीही‎ या चोरांना पकडण्यासाठी जिवाचे रान करत असून शेत शिवारांमध्ये गस्त‎ घालत आहेत. जिल्हा पोलिस यंत्रणेकडून सावदा पोलिस ठाण्याला १०‎ पोलिस कर्मचाऱ्यांची जास्तीची कुमक देण्यात आली आहे. आता पोलिस‎ यंत्रणा चिनावल, कुंभारखेडा, सावखेडा परिसरातील चोरट्यांना पकडून‎ कडक कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...