आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी गटाने मारली बाजी:उपसरपंच निवडीत कुऱ्हे पानाचे ग्रा.पं.मध्ये फूट ; सत्ताधाऱ्यांचे 11 पैकी 3 सदस्य फुटले

कुऱ्हे पानाचे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुऱ्हेपानाचे येथे शुक्रवारी उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात वॉर्ड क्रमांक ४ मधील सदस्य हरिश्चंद्र बाळू बरकले यांना १७ पैकी ९ मते मिळून ते विजयी झाले.उपसरपंच विलास रंदाळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सत्ताधारी गटाकडून शारदा संदीप महाजन, तर विरोधी गटातील हरिश्चंद्र बाळू बरकले यांनी अर्ज दाखल केला होता. एकूण १७ सदस्य असलेल्या कुऱ्हे पानाचे ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी सरपंच कविता उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या शारदा संदीप महाजन यांना ८, तर प्रतिस्पर्धी विरोधी गटातील हरिचंद्र बाळू बरकले यांना ९ मते मिळाली. हरिश्चंद्र बरकले यांची उपसरपंचपदी - निवड झाली. सत्ताधारी गटाकडे एकूण ११ सदस्य असताना शारदा महाजन ह्या उपसरपंच होतील असे ठरले होते. पण सत्ताधारी गटातील ३ मते फुटल्यामुळे त्यांना एकूण ८ मत पडली. तर विरोधी गटातील सदस्याला ९ मते पडल्याने सर्वांना सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निवडणूक प्रक्रियेत ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार यांनी मदत केली. सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...