आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:राजकारणाच्या मैदानात भाजपचा भोंगा घेऊन एक भुंगा फिरतोय : धनंजय मुंडे, इंधवे येथे राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीका

अमळनेर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सत्तेत आल्याने ते पाडण्यासाठी विरोधक अनेक प्रयत्न करत आहे. मात्र महाविकास आघाडीला काही धक्का लागत नसल्याने त्यांनी आता जातीचे राजकारण सुरु केले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करायचे आहे.त्यामुळे विरोधी पक्षाने हनुमान चालीसा व भोग्यांचे राजकारण सुरु केले आहे. राजकारणाच्या मैदानात भाजपचा भोंगा घेऊन एक भुंगा फिरतोय, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्र सोडले. पारोळा तालुक्यातील इंधवे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा संवाद मेळावा शनिवारी (दि.७) झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, दिलीप वाघ, कैलास पाटील, दिलीप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंधवे गटाचे माजी जि.प. सदस्य जितेंद्र पाटील व त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सभापती छायाबाई पाटील व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सरचिटणीस हाजी एजाज मलिक, फेडरेशन चेअरमन संजय पवार, प्रवक्ता योगेश देसले, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय समितीच्या सदस्या रिता बाविस्कर, बाजार समिती मुख्य संचालिका तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, प्रदेश प्रतिनिधी शिवाजी पाटील, सुलोचना पाटील, योजना पाटील, आशा चावरिया, वैशाली ससाणे, कविता पवार, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, भागवत पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...