आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपविजेतेपद‎:क्रिकेट स्पर्धेत सरदार जी.जी. हायस्कूल विजयी‎

रावेर‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय तालुकास्तरीय क्रिकेट‎ स्पर्धा शुक्रवारी मॉडर्नइंग्लिशस्कूलतर्फे घेण्यात आली.‎ श्री व्ही.एस.नाईक‎ महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर झालेल्या या स्पर्धेत सरदार ‎जी.जी.हायस्कूलच्या संघाने ‎विजेतेपद पटकावले.‎१७ व १९ वर्षे वयोगटात सरदार ‎जी.जी.हायस्कूलने वर्चस्व ठेवून ‎अजिंक्यपद मिळवले. तर १४ वर्ष‎ वयोगटात हायस्कूलचा संघ‎ उपविजेता ठरला. विजयी‎ खेळाडूंना क्रीडा विभागाचे प्रमुख‎ जे.के.पाटील, युवराज माळी,‎ किरण महाजन यांचे मार्गदर्शन‎ लाभले.

प्रशिक्षक प्रतिक खराले‎ यांनी उत्तम कामगिरी केली. तसेच‎ शाळेचे मुख्याध्यापक शिरीष‎ वाणी, उपमुख्याध्यापक‎ ई.जे.महाजन, पर्यवेक्षक‎ एस.आर.महाजन, एस.पी.पाटील‎ यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन‎ केले. स्पर्धेदरम्यान तालुका क्रीडा‎ समन्वयक ए.पी.पाटील, जयेश‎ बिरपन, श्रीकांत महाजन, दत्तू‎ पाटील, शे.असलम, मंगेश‎ महाजन, दीपक जाधव, हेमंत देव‎ यांचे खेळाडूंना सहकार्य लाभले.‎ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद‎ लाभला. या स्पर्धेत विजयी‎ झालेल्या संघाची निवड पुढील‎ स्पर्धेसाठी केली जाणार आहे.‎ खेळाडूंचे कौतुक होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...