आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक स्पर्धा:समूहनृत्य स्पर्धेमध्ये लहान गटात साेल एंजल ग्रुप प्रथम

भुसावळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय गणेश फाउंडेशनतर्फे सुरभीनगरात नवसाचा गणपती उत्सवात सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात समूहनृत्य स्पर्धेत ‘सेाल एंजल ग्रुप’ प्रथम, ‘माेरया गर्ल्स ग्रुप’ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्यांना डीवायएसपी साेमनाथ वाकचाैरे यांच्याहस्ते पारिताेषिक वितरण करण्यात आले. व्यासपीठावर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, ट्राॅमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मयूर चाैधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार, बांधकाम व्यावसायिक राजेश राका, बाबू चाेरडिया उपस्थित हाेतेे.

भुसावळचे जय गणेश फाउंडेशन सांस्कृतिक अभिरुची वाढवण्याचे काम करते आहे. किंबहुना, सामाजिक एकता, सलाेखा अबाधित ठेवण्यावरही भर देत आहे. इथल्या कलारसिकांची सांस्कृतिक भूक फाउंडेशनच्या माध्यमातू भागवण्याचे काम पथदर्शी आहे. गणेशाेत्सवाला हे फाउंडेशन दरवर्षी जी सांस्कृतिक उपक्रमांची जाेड देते ती इतरांनीही प्रेरणा घ्यावी अशीच आहे, असे डीवायएसपी वाकचाैरे यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान गट : पायल पवार, मानस जाधव, स्वरुप जाेशी, माेठा गट : प्रियांशी लाेहार, कशिश वारके, धनश्री वाघमारे.
साेलाे डान्स लहान गट : नुपूर भालेराव, आराेही गाेडसे, मनुदेवी राजपूत, माेठा गट : वैष्णवी काेळी, अश्विनी तायडे, शिवानी टाेपरे.
चित्रकला स्पर्धा बाल गट : कल्याणी ढाके, कर्णिका टेंभूर्णीकर, जान्हवी चाैधरी, लहान गट : आेवी जाधव, नॅन्सी चावला, तानिया ललवाणी. माेठा गट : देवाशिष साेनार, तुषार लक्षवाणी, वंदना परदेशी.
रांगाेळी स्पर्धा : ममता सिडाम, हिना काेळी, हेतल राठाेड तर उखाणे स्पर्धेत स्वाती जाधव, दीपाली पवार, जयश्री ढाके.

बातम्या आणखी आहेत...