आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:पंजाब मेलमध्ये सव्वा‎ लाखांचा मुद्देमाल लंपास‎‎

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब मेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा एक लाख ३७‎ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्याने‎ लंपास केली. याप्रकरणी भाेपाळ लाेहमार्ग‎ पाेलिसांकडून शून्य क्रमांकाने कागदपत्रे आल्यावर‎ बुधवारी रात्री उशीरा भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा‎ दाखल झाला.‎ भाेपाळ येथील रहिवासी शुभम मिश्रा हे २६‎ फेब्रुवारीला पंजाब मेलच्या ए-१ डब्यातील ४९‎ क्रमांकाच्या सीटवरून प्रवास करत होते. प्रवासात‎ त्यांना झोप लागल्याने, मनमाड ते जळगाव दरम्यान‎ रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची बॅग चोरट्याने‎ लांबवली.

बॅगेत माेबाईल, साेन्याचे रिंग यासह अन्य‎ साहित्य चाेरट्याने लांबवले. याप्रकरणी मिश्रा यांनी‎ भाेपाळला जाताना गाडीतील टीसीला चाेरीची फिर्याद‎ दिली. ही फिर्याद भाेपाळ येथे पाेहोचल्यावर त्यांनी‎ तेथील लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात दिली. तेथून शून्य‎ क्रमांकाने हा गुन्हा भुसावळ लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात‎ वर्ग झाला. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र ठाकूर तपास‎ करत आहेत. प्रवाशांनी आपल्यासोबत मौल्यवान‎ ऐवज नेऊ नये, असे आवाहन भुसावळ लोहमार्ग‎ पोलिसांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...