आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:पावसाळ्यात दीपनगरात केंद्रातील कोळशाची टंचाई होणार आणखी तीव्र ; पावसाळ्यात ओल्या कोळशाची समस्या

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात ओल्या कोळशाची समस्या निर्माण होऊन वीजनिर्मितीवर परिणाम होतो. यामुळे दीपनगर औष्णिक केंद्रात उन्हाळ्यातच किमान महिनाभराचा कोळसासाठा केला जातो. मात्र यंदा उन्हाळ्यातच टंचाई निर्माण झाली, सध्याही ती कायम असल्याने दीपनगर केंद्राकडे पावसाळ्यात वापरण्याचा साठाच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. या काळात पुरवठा थांबल्यास एक किंवा दोन संच बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. पावसाळ्यात कोळशाच्या खाणींमध्ये पाणी शिरल्याने कोळसा काढणे जिकरीचे होते. याच काळात पावसामुळे वाहतुकीच्या दरम्यानही कोळसा ओला होऊन वीजनिर्मितीवर परिणाम होतो. पावसाळ्याच्या काळात वीजेची मागणी कमी असल्याने कोळशाचा वापर सुमारे २५ ते ३० टक्यांनी कमी होतो. पावसाळ्यातील कोळशाची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून दीपनगर केंद्रात उन्हाळ्यामध्येच किमान १४ तर कमाल ४० दिवसांचा साठा करुन ठेवला जातो. यंदा मात्र उन्हाळ्यातच टंचाई असल्याने दीपनगर केंद्राकडे जेमतेम ३ दिवसांचा साठा आहे. पावसाळ्यात साठाच होऊ शकणार नसल्याने मिळेल त्या कोळशातून विजनिर्मिती करावी लागणार आहे. ओल्या कोळशामुळे तसेच पावसामुळे वाहतूकीत अडथळा निर्माण झाल्यास कोळशाअभावी संच बंद ठेवण्याची वेळ येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...