आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतर:विरावली विकासोत राष्ट्रवादीचा सेनेला दे धक्का, 13 पैकी तब्बल 10 जागा जिंकून घडवले सत्तांतर

यावल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विरावली विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने शिवसेनेच्या पॅनलचा दारुण पराभव केला. १३ पैकी एक जागा बिनविरोध निघाली होती. उर्वरित १२ पैकी १० जागा राष्ट्रवादीच्या पॅनलने, तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या.

विरावली येथील विकास सहकारी सोसायटीची सन २०२१ ते २०२६ या कार्यकाळासाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. १३ जागांसाठी ३९ अर्ज होते. माघारीनंतर एक जागा बिनविरोध झाली. छाननीनंतर १२ जागांसाठी २४ उमेदवारांमध्ये सरळ लढत होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे बाजीराव माणिकराव पाटील २०० मते, प्रल्हाद गोकुळ पाटील १९८, अर्जुन माणिक पाटील १९०, कोकिळा उत्तम पाटील १९२, प्रमिला शालिक पाटील १८३, उषा प्रकाश महाजन १७५, युवराज पंडित पाटील १७३, नरेंद्र दयाराम कोळी १७१, गुलाब रघुनाथ पाटील १६९, रमेश हरसिंग पाटील हे १६९ मते घेत विजयी झाले. शिवसेना पुरस्कृत पॅनलचे तुषार सांडुसिंग पाटील (मुन्ना पाटील) (१८३ मते) व संजय मोतीराम पाटील हे १७५ मते मिळवत विजयी झाले. तर शिवसेनेचे लिलाधर विठ्ठल सोनवणे हे बिनविरोध ठरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला १०, तर शिवसेनेकडे ३ जागा गेल्या. या विकासोत एकुण ४९६ मतदार होते. पैकी ३९० मतदारांनी मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी डी.जे.तडवी यांनी काम पाहिले. निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

राष्ट्रवादीकडून जल्लोष....या निवडणुकीत राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अॅड.देवकांत पाटील यांनी सर्व धुरा सांभाळली होती. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष अनिल साठे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील, धीरज महाजन आदींनी अॅड.पाटील यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...