आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १३ ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या १७ जागांपैकी केवळ ६ ग्रामपंचायतींमधील ६ जागांकरिता शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शेवटच्या दिवसअखेर केवळ १२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. तर सात ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. यातील भालोद आणि बोरखेडा बुद्रुक येथील दोन जागा बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले. तर उर्वरीत ४ जागांकरिता १० उमेदवारी अर्ज आहेत. माघारीनंतर या चार ठिकाणी हाेणाऱ्या लढतींचे चित्र स्पष्ट होईल. तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमधील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या १७ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यासाठी १३ ते २० मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. शुक्रवारी शेवटच्या दिवशी १३ पैकी ६ ग्रामपंचायतीत प्रतिसाद मिळून एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात बोरखेडा बुद्रुक प्रभाग क्रमांक ३ च्या एसटी महिला राखीव जागेकरिता गुलशन रमजान तडवी व भालोद ग्रा.पं.च्या प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जातीच्या जागेकरिता सचिन गौतम भालेराव यांचे प्रत्येकी एक अर्ज असल्याने या जागा बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले. तर सावखेडा सिम प्रभाग क्र.३ एसटी महिला जागेसाठी मुमताज सुलेमान तडवी, कलीमा अकबर तडवी व फरिदा बुऱ्हाण तडवी यांचे तीन, डांभुर्णी प्रभाग क्र.५ एसटी महिला जागेसाठी सुनंदा हिरालाल कोळी व सुमित्रा गिरीश विसवे यांचे दोन, राजोरा प्रभाग क्र.२ सर्वसाधारण जागेसाठी चेतन विनायक पाटील व पराग दिवाकर पाटील यांचे दोन आणि हिंगोणा प्रभाग क्र.४ एसटी महिला जागेसाठी मीना अरमान तडवी, नशिबा रहेमान तडवी व मदिना हमीद तडवी यांचे तीन अर्ज प्राप्त झाले आहे. या पोटनिवडणुकीत आता ४ ग्रामपंचायतींच्या ४ जागांसाठी १० अर्ज आहेत. या अर्जांची २३ रोजी छाननी होईल. माघारीसाठी २५ पर्यंत मुदत आहे. त्यामुळे माघारीनंतर त्या ठिकाणी लढती स्पष्ट होतील. तालुक्यातील गिरडगाव, कोळन्हावी, आडगाव, पिळोदा बुद्रुक, शिरागड, बोरावल खुर्द व म्हैसवाडी या सात ग्रामपंचायतींमधील ११ जागांकरिता दिलेल्या मुदतीत एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. माघारीनंतर २५ रोजी दुपारी ३ वाजता उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. मतदान ५ जून रोजी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन जगताप, हनीफ तडवी, मिलिंद देवरे, बबिता चौधरी, शेखर तडवी, पी.ए. कडनोर काम पाहत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.