आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलजीवन मिशन अंतर्गत जामनेर तालुक्यातील १०८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावांनी आपले पाणीपुरवठ्याचे स्रोत बळकट करावे असा या मिशनचा उद्देश आहे. त्यापैकी १२ गावांमधील ६० प्रशिक्षणार्थींना पंचायत समितीतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक गावाला जलजीवन मिशन योजनेबाबत क्षमतावर्धन प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन सहायक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्याहस्ते झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमालासरपंच, स्वच्छताग्रही, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर, महिला बचतगटातील सदस्यांना आमंत्रित केलेहोते. एका बॅचला दोन दिवस अशा९ बॅचला प्रशिक्षण देण्यात आले.एका बॅचमध्ये एका गावातून पाचअसे १२ गावांमधून ६० प्रशिक्षणार्थीसहभागी झाले होते. जलजीवनमिशन हा केवळ पायाभूत निर्मितीचाकार्यक्रम नसून शाश्वत व सक्षमसेवा पुरवण्याचा उपक्रम आहे. यातप्रत्येक व्यतीला स्वच्छ व शुद्ध ५५लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्टया योजनेचे आहे. त्यानुसार उपाययोजना केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.