आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:कुसुंबा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

रावेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुसुंबा येथील ६६ वर्षीय शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाखाली विषारी औषध घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी रावेर पोलfस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कुटूंबा खुर्द येथील सुधीर राजाराम जावळे (वय ६६) हे शनिवारी (दि.३) सकाळी घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेले होते. मुलांनी त्यांची शोधाशोध केली केली.

त्यात त्यांचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाखाली आढळला. त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, शेतकरी जावळे यांच्याकडे साडेसहा एकर शेती आहे. तेथे त्यांनी केळी लागवड केली आहे. त्यांच्यावर पाच लाखाचे कर्ज असल्याचे मुलगा राहुल जावळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...