आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पीक वाहून गेल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याची ओझर येथे आत्महत्या

जामनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून, सोमवारी विष प्राशन करत आत्महत्या केली. गजानन नारायण महाजन असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी वडिलोपार्जित चार एकर शेतीत कर्ज घेऊन मका व कपाशीचे पिक घेतले होते.

आधी अल्प पावसामुळे निम्मे पिक कोमेजले होते. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिके वाहून गेल्याने महाजन खचले. त्यामुळे रविवारी शेतातच त्यांनी विष प्राशन केले. त्यांना येथे उपजिल्हा रूग्णालयात व तेथून पुढील उपचारांसाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...