आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध स्पर्धा:स्वातंत्र्यदिनी चित्रकला, रांगोळी स्पर्धा ; कुऱ्हेपानाचे येथील रा.धों.माध्यमिक विद्यालयातील उपक्रमांना प्रतिसाद

कुऱ्हे पानाचे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रा.धों.माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निबंध, चित्रकला, वक्तृत्व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. विविध महापुरुषांच्या वेशभूषेसह विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली. ध्वजारोहण ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर यांच्या हस्ते झाले.

यानंतर दहावीतील गुणवंतांचा सत्कार झाला. तत्पूर्वी, सहावीतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून गावात प्रभातफेरी काढली. यानंतर वक्तृत्व स्पर्धा झाली. त्यात ‘एका क्रांतिकारकाचे मनोगत, देश माझा मी देशाचा, मी तिरंगा बोलतो आहे’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी मत मांडले. निबंध स्पर्धेतसाठी ‘माझा आवडता देशभक्त, सैनिकाचे मनोगत’ आणि रांगोळी स्पर्धेसाठी भारतमाता, हर घर तिरंगा हे विषय दिले होते. तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम धोंडू बडगुजर यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित रंगभरण स्पर्धेत २०० विद्यार्थी सहभागी झाले. मंडळाच्या उपाध्यक्षा भावना बडगुजर, संचालक घनश्याम बडगुजर, सदस्य नंदलाल छाजेड यांनी सर्वांचे कौतुक केले. मुख्याध्यापक आर.व्ही.गवळी, पर्यवेक्षक एस.डी.वाघ आदी उपस्थित होते.

हर्षाली सपकाळे, संस्कृती गांधेले, हर्षल बारी विजेते
रांगोळी स्पर्धेत हर्षाली नारायण सपकाळे, मोक्षदा दिलीप सूर्यवंशी यांनी भारत मातेची रांगोळी काढून प्रथम क्रमांक मिळवला. चित्रकला स्पर्धेत हर घर तिरंगा हे चित्र रेखाटून संस्कृती गांधेले या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. तर वक्तृत्व स्पर्धेत क्रांतिकारकांचे व देशाप्रती प्रेम व्यक्त करून हर्षल विनोद बारी व अनिकेत पाटील हे प्रथम आले.

बातम्या आणखी आहेत...