आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी घ्या:दिवाळीत मिठाईचा मोह महागात, सुमारे 20 % मधुमेहींची शुगर वाढली; नवीन रुग्णांमध्येही वाढ

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीसाठी घराघरात चवदार मिठाई, रुचकर फरसाण तयार केले जाते. हे गोड पदार्थ खाण्याचा मोह आवरला जात नाही. मात्र, हाच मोह मधुमेह असलेल्या खवय्यांना अडचणीत आणत आहे. कारण, शुगर लेव्हल वाढल्याची लक्षणे जाणवताच रक्त, लघवी तपासणाऱ्यांची संख्या शहरात वाढली. त्यात सरासरी २० टक्के मधुमेहींची शुगर वाढल्याचे समोर आले आहे. त्यातही नव्याने मधुमेह आढळणाऱ्यांचे प्रमाण ४०० तपासण्यांमागे २० ते २५ पर्यंत असल्याचे, असे लॅब चालकांनी सांगितले. मधुमेह असला तरी कुटुंबीय, आप्तेष्टांच्या आग्रहामुळे अनेक जण धोका विसरून मिठाईवर ताव मारतात.

अनेकवेळा प्रवासात घडल्यास औषधोपचाराच्या नियमित वेळा चुकतात. व्यायाम देखील करता येत नाही. काही मधुमेही घरीच औषधी विसरतात. या सर्वांचा परिणाम शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यात होतो. शहरातील पॅथॉलॉजी लॅब चालकांना विचारणा केली असता आमच्याकडे नियमित तपासणीला येणाऱ्यांपैकी सरासरी २० टक्के मधुमेहींची शुगर नियंत्रणाबाहेर गेल्याचे व युरिन इन्फेक्शनचा त्रास आढळला. तसेच दिवसभरात सुमारे २० ते २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. भुसावळात ५ लॅब आहेत.

ताणतणाव टाळा, नियमित व्यायाम करा
मधुमेह वाढीला बदलती जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आदी कारणे आहेत. मधुमेहापासून लांब राहायचे असल्यास ताणतणावापासून लांब राहावे. दररोज ठराविक अंतर पायी चालणे, व्यायाम, योगासन-प्राणायाम करावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. - डाॅ. वसंत चाैधरी, एमडी, भुसावळ

पथ्ये पाळा, नियमित तपासणी करा
मधुमेहाच्या रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने दिलेली औषधे नियमित घ्यावी. वेळोवेळी आवश्यक तपासण्या कराव्या. सोबत शरीराला पूरक व्यायाम नियमित करावा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवून पुढील गुंतागुंत टाळता येईल.-डाॅ.प्रवीण महाजन, पॅथॉलॉजिस्ट, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...