आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक सुरक्षा‎ सप्ताह:आयटीआयमधील विद्यार्थ्यांना दिली‎ औद्योगिक सुरक्षा नियमांची माहिती‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय औद्योगिक‎ प्रशिक्षण संस्थेने जागतिक सुरक्षा‎ सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना‎ औद्योगिक सुरक्षा नियमांची माहिती‎ देण्यात आली. आगीसारख्या‎ दुर्घटना रोखण्यासाठी कोणती‎ उपाययोजना करावी? याविषयी‎ भुसावळ पालिकेच्या अग्निशामक‎ विभागातील प्रवीण मिठे यांनी संवाद‎ साधला. यानंतर आग विझवण्याची‎ प्रात्यक्षिके करून दाखवली.‎ सुरूवातीला औद्योगिक सुरक्षा ही‎ संकल्पना म्हणजे काय? तिची‎ आवश्यकता याविषयी माहिती‎ देण्यात आली. यानंतर पालिकेचे‎ प्रवीण मिठे यांनी अग्निशामकाचा‎ वापर करुन लागलेली आग कशी‎ विझवावी? याची प्रात्यक्षिके करून‎ दाखवली. यावेळी संस्थेतील राष्ट्रीय‎ सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी‎ एम.पी.पाटील, गट निदेशक‎ एम.बी.गवई, एच.ई.पाने आणि‎ विद्यार्थी उपस्थित होते. याच दिवशी‎ संस्थेत औद्योगिक सुरक्षा पोस्टर्स‎ प्रदर्शनाचे आयोजन केले होते.‎

बातम्या आणखी आहेत...