आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे:उद्याेजक : एमआयडीसी देते रस्ते, पथदिवे, पाणी; ग्रा.पं.ना कर का

श्रीकांत सराफ | भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीत कोणत्याही सुविधा न देता ग्रामपंचायतीकडून कर वसुलीचा हट्ट धरला जातो. हा प्रकार चुकीचा आहे. कारखानदार मालमत्ता कर भरू शकतात. मात्र, ग्रामपंचायतींकडून ज्या सुविधा पुरवल्याच जात नाही, त्यांचा कर कसा भरणार? असा पवित्रा भुसावळ इंड्रस्टिअल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने घेतला आहे. तर गेल्या चार-पाच वर्षात एकाही कारखानदाराने कर भरला नाही. त्यामुळे सुविधा कशा पुरवणार? आधी कर भरा नंतरच सुविधांची मागणी करा, या भूमिकेवर ग्रामपंचायती ठाम आहेत.

तालुक्यातील खडका, किन्ही व कन्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत भुसावळ एमआयडीसीचे कार्यक्षेत्र आहे. ड वर्ग असा दर्जा असून सध्या ३०० कारखानदार आहेत. त्यापैकी १०० कारखाने उत्पादन काढतात. दरम्यान, कर मागणीच्या मुद्द्यावरून तिन्ही ग्रामपंचायती आणि कारखानदार आमनेसामने आले आहेत. ग्रामपंचायतींकडून मालमत्ता व अन्य करांची मागणी होताच कारखानदारांनी त्यास विरोध केला. जर ग्रामपंचायतींकडून सुविधा मिळत नसतील तर कर भरणा का करावा? अशी त्यांची भूमिका आहे.

आज आमदारांच्या उपस्थितीत बैठक
कर भरण्याच्या मुद्द्यावरून कारखानदार व ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी शुक्रवारी दुपारी २ वाजता आमदार संजय सावकारे बैठक घेणार आहेत. एमआयडीसीत होणाऱ्या या बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजक, संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवकांची उपस्थिती राहील.

ग्रामपंचायती : हा तर नियम, कर भरा, सर्व सुविधा देण्यास बांधील
रस्त्यांची दुरवस्था, माल वाहतूक अडचणीत
ड वर्ग भुसावळ एमआयडीसीतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. ते कोण तयार करणार? रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कच्चा-पक्क्या मालाच्या वाहतुकीसाठी अवजड वाहने येतात तेव्हा अपघात होण्याची भीती असते. डीवायएसपी कार्यालयाजवळून एक रस्ता एमआयडीसी परिसरात येताे. त्याचे काम अजूनही सुरू न झाल्याचा कारखानदारांचा रोष आहे.

आज आमदारांच्या उपस्थितीत बैठक
कर भरण्याच्या मुद्द्यावरून कारखानदार व ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी शुक्रवारी दुपारी २ वाजता आमदार संजय सावकारे बैठक घेणार आहेत. एमआयडीसीत होणाऱ्या या बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजक, संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवकांची उपस्थिती राहील.

बातम्या आणखी आहेत...