आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ ग्रामीण बससेवा सुरू करा

रावेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी सर्व शाळा सुरू होत असून ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. मात्र कोरोनामुळे बंद केलेल्या ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ग्रामीण भागातील बससेवा बुधवारपासून सुरू करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चातर्फे आगार प्रमुख नीलेश बेंडकुळे यांच्याकडे केली.

बुधवारपासून शाळा सुरू होत असल्याने बसअभावी या विद्यार्थ्यांची गैरसोय हाेईल. ती टाळण्यासाठी बससेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी पं.स. सदस्य पी.के. महाजन, संदीप सावळे, हरलाल कोळी व पदाधिकाऱ्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...