आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:वित्त आयोगाच्या कामांबाबत विचारणा

यावल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंगरकठोरा ग्रामसभा विविध मुद्द्यांवर गाजलीतालुक्यातील डोंगरकठोरा येथील ग्रामसभा वित्त आयोगाच्या निधीतून झालेली कामे, ग्रामसेवकाचे नियमित हजर न राहणे, आरोग्य सेवकाची तक्रार, शिक्षक मुख्यालयी राहत नाही अशा विषयांवरून गाजली. याशिवाय डोंगरदे वस्तीतील आदिवासी बांधवांना गावठाण वस्तीत जागा देण्याची मागणी देखील पुढे आली.

विविध कार्यकारी सोसायटीच्या आवारात ही ग्रामसभा झाली. ग्रामसेवक एम.टी.बगडे यांनी विषय वाचन केले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना कृती आराखडा व इतर योजनांची माहिती दिली. माजी सदस्य छब्बीर तडवी यांनी १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांबद्दल माहिती विचारली. सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनंजय पाटील, पोलिस पाटील राजरत्न आढाळे, सदस्य दिलीप तायडे, जुम्मा तडवी, आशा आढाळे आदी उपस्थित होते.महिलांच्या प्रशिक्षणावर खर्च झाला, पण बिल नाहीगावातील महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात अपहार झाल्याची ग्रामस्थाची तोंडी तक्रार आहे.

प्रशिक्षणावर ८० हजारांचा खर्च दाखवला, पण दप्तर व बिल दाखवले नाही, असा मुद्दा उपस्थित झाला.ग्रामीण रोजगार हमी योजना कृती आराखडा व इतर योजनांची माहिती दिली. माजी सदस्य छब्बीर तडवी यांनी १५व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांबद्दल माहिती विचारली. सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनंजय पाटील, पोलिस पाटील राजरत्न आढाळे, सदस्य दिलीप तायडे, जुम्मा तडवी, आशा आढाळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...