आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर पुरनाड (ता.मुक्ताईनगर) तपासणी नाक्यावर परिवहन विभागातील अधिकारी ट्रक चालकांना लुटतात. वजन मापात फेरफार करून अवैधपणे पैसे जमा केले जातात. या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? असा प्रश्न आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी लेखी उत्तर दिले. त्यात पुरनाड नाक्यावर नेमलेल्या खासगी कंत्राटदाराची चौकशी व कारवाई होईल. तेथील वजन काट्यांची आठवड्यातून एकदा तपासणी करावी, याबाबतदेखील सूचना केल्याचे म्हटले आहे.
खडसे यांनी जळगाव मनपा हद्दीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न मांडला. त्यात रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षात किती निधी मंजूर व खर्च झाला? रस्ते दुरुस्तीसाटी कोणती कार्यवाही केली? अशी विचारणा केली. या प्रश्नाला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले. तसेच मुक्ताईनगरातील पुरनाड तपासणी नाक्यावर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीच्या तक्रारीबाबत नाक्यावरील खासगी कंत्राटदाराची चौकशी, वजन काट्यांची आठवड्यातून एकदा तपासणी करण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना कळवले आहे असे उत्तर दिले. यावेळी खडसेंनी जळगाव मनपा हद्दीतील रस्त्यांचा प्रश्नदेखील उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.