आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ विभाग रेल्वे सल्लागार समितीची बैठक मंगळवारी डीआरएम कार्यालयात झाली. या बैठकीत श्री क्षेत्र शेगाव ते साईनगर शिर्डी दरम्यान मेमू गाडी सुरु करावी, अशी मागणी समिती सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी यांनी केली. सध्या मेमू गाड्यांची संख्या कमी आहे. अतिरिक्त गाड्या उपलब्ध होता मागणीवर विचार होईल, असे उत्तर या प्रश्नावर रेल्वे विभागाने दिले आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी डीआरएम एस.एस.केडिया तर वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ. शिवराज मानसपुरे उपस्थित होते. शिर्डी सोबतच शेगाव येथे भाविकांची संख्या वाढती असल्याने शिर्डी ते शेगावदरम्यान मेमू एक्सप्रेस सुरु करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. यानंतर भुसावळातील कॉड लाईनवरुन राजस्थानकडे जाणाऱ्या तीन एक्स्प्रेस गाड्यांना भुसावळ स्थानकावर वळवावे, अशी मागणी कुलकर्णींनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.