आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानक व परिसराची जळगाव येथील बीडीडीएस पथकाने पाहणी केली. स्थानकात श्वान वीरूच्या मदतीने घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. दरम्यान, स्थानकावर ८४ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी जळगाव येथील बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण केले. त्यांच्या मदतीने भुसावळ रेल्वे स्थानकाची पाहणी केली. संपूर्ण रेल्वे स्टेशन, अडगळीच्या जागा, पार्सल ऑफिस, तिकीट बुकिंग हाॅलमध्ये तपासणी झाली. त्यात काहीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
या पाहणीत श्वान विरुच्या मदतीने घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. लोहमार्ग पोलीस निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक संजय साळुके, हवालदार प्रदीप शेजवळकर, पोलिस नाईक महेश जैन, भुसावळ आरपीएफ ठाणे येथील निरीक्षक आर.के.मीना, हवालदार विजय जोहरे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.